कणकवली १००० विद्यार्थी एकाच वेळी वाजवणार संगीत वाद्य
२८ रोजी कणकवलीत घडणार विश्वविक्रम
आयडियल इंग्लिश स्कूल सोमास्थ अकॅडमी आणि सिंधू गर्जना ढोल पथका च्या वतीने आयोजन
कणकवली : जिल्हा वासियांना आता उद्याच्या २८ फेब्रुवारी ची प्रतीक्षा लागून राहिली आहे कणकवलीतील आयडियल इंग्लिश स्कूल सोमास्थ अकॅडमी आणि सिंधू गर्जना ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवलीत एका विश्वविक्रमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
यामध्ये 1000 पालक आणि विद्यार्थी यांचा संगीतातील वेगवेगळी वाद्य एकाच वेळी वाजवण्याचा विश्वविक्रमी उपक्रम होणार आहे या वाद्यांमध्ये ढोल ताशा तबला पेटी ढोलक मृदुंग टाळ हलगी दिमडी अशा विविध वाद्यांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांकरवी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती तयार करून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त शाळा विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वर्गशिक्षक किंवा खालील नंबरवर संपर्क साधावा.
८६०५०५५०७६,७६६६४९५८७०
९०८२६६९८११,८००७८५०५९३
७०५७२९२९८५,९३५९१९३६५९
नावनोंदणीसाठी अंतिम तारीख 20/02/2023 राहील.
सितराज परब / कोकण नाऊ / कणकवली