कुडाळमध्ये २१ ला मोफत आरोग्य तपासणी

कुडाळ लायन्स क्लबचा उपक्रम

रक्तातील साखर, चरबी घटक वगैरेची चाचणी

प्रतिनिधी । कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग आणि डॉ रेड्डी लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पाटणकर यांच्या शांता हॉस्पिटल येथे २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १ या वेळेत रक्तातील साखर तपासणी, चरबी चे घटक तपासणी (लिपिड प्रोफाइल) , ब्लड प्रेशर तपासणी व त्या अनुषंगाने डॉक्टरांचे मार्गदर्शन पूर्णतः निःशुल्क केले जाईल.रुग्णांनी येताना रिकाम्या पोटी यावे. तसेच डाएट चार्ट देखील देण्यात येईल. अगोदर नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सचिव स्नेहा नाईक यांनी केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!