वायंगणी स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनानिमित्त २५रोजी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

आचरा–अर्जुन बापर्डेकर वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा अकरावा वर्धापन दिन सोहळा २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे या निमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शनिवार २३डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता स्वामींची पालखी मठातून वायंगणी गावात परीक्रमेसाठी निघणार आहे.दुपारी ठाणेश्वर मंदिर येथे महाप्रसाद होणार आहे.सायंकाळी सहावाजता पालखी चे मठात आगमन होणार आहे.यावेळी स्वामी समर्थ चलचित्र खास आकर्षण असणार आहे.रविवार २४डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता राजोपच्यार पुजा दुग्धाभिषेक सहस्त्र बिल्वार्पण पुजन आदी कार्यक्रमांनंतर सकाळी नऊ वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ व ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय भावगीत भक्तीगीत गायन स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सत्यदत महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे.सोमवार २५डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी महाप्रसाद सायंकाळी हळदीकुंकू समारंभ तर रात्री दहा वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी तर्फे खुल्या रेकार्डडान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.अधिक माहिती साठी मंडळाचे अध्यक्ष सदानंद राणे ८००७५५३८०१ यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे

error: Content is protected !!