उज्वला गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रम शुक्रवार १५रोजी चिंदर येथेपंचक्रोशीतील ग्राहकांनी लाभ घ्यावा – राजन गांवकर
मालवण तालुका खरेदी विक्री संघ लिमिटेड मालवण भारत गॅस एजन्सी मालवण यांच्या वतीने पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शन वाटप व नवीन उज्वला गॅस कनेक्शन अर्ज स्वीकारणे कार्यक्रम शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता चिंदर ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला आहे .हा कार्यक्रम आचरा पंचक्रोशीतील ग्राहकांसाठी असून सर्व उज्वला गॅस लाभार्थ्यांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर यांनी केलेआहे. तसेच सर्व भारत गॅस घरगुती गॅस कनेक्शनधारकांना कळविण्यात येते की इ केवायसी करून घेणे सरकारने अनिवार्य केले आहे त्यामुळे सर्व गॅस ग्राहकांनी गॅस कार्ड व आधार कार्ड सह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
आचरा / अर्जुन बापर्डेकर