कोल्हापूर येथील तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलच्या सिद्धी प्रसाद चे यश.

कणकवली/मयुर ठाकूर

कोल्हापूर येथे नुकताच खासदार महोत्सव पार पडला या महोत्सवात रोप मल्लखांब स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडेच्या इयत्ता सहावीच्या सिद्धी हरी ओम प्रसाद हिने रौप्य पदक प्राप्त केले आहे रोप मल्लखांब हा प्रशालेत घेतला जाणारा मार्शल आर्ट मधील एक प्रकार आहे .
सिद्धीच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे , उपाध्यक्ष श्री मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर खजिनदार सौ .शितल सावंत मॅडम सल्लागार डी.पी तानवडे सर आयडियलच्या मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे

error: Content is protected !!