वेंगुर्ला, दोडामार्ग, शिरोडा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक लवकरच

नागपूर येथे आरोग्यमंत्री व मंत्री केसरकर यांची बैठक संपन्न.
सावंतवाडी/प्रतिनिधी वेंगुर्ला, दोडामार्ग शिरोडा रुग्णालयात नवीन डॉक्टरांची भरती सुरु झाली आहे. चारही रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक लवकरच देण्यात येणार आहे, तसा निर्णय झाला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
नागपूर येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची बैठक पार पडली.वेंगुर्ला, दोडामार्ग शिरोडा व सावंतवाडी मतदार संघातील रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेविषयी या बैठकीत चर्चा झाली.या बैठकीनंतर केसरकर बोलत होते