‘विकसित भारत संकल्प यात्रा’ योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार “येथे”

कणकवली तालुक्यात साकेडी, करंजे मध्ये येणार चित्ररथ
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ मंगळवार दि.12 डिसेंबर 2023 रोजी पुढील गावांत योजनांची माहिती देण्यासाठी फिरणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील निगुडे आणि मडुरा, देवगड तालुक्यातील शिरगांव आणि हडपीड, कणकवली तालुक्यातील साकेडी आणि करंजे तर कुडाळ तालुक्यातील गोठोस आणि नारुर या गावांत योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
कणकवली प्रतिनिधी