हुबरट पावणादेवी मूळ देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव 12 डिसेंबर रोजी

कणकवली तालुक्यातील हुबरट पावणादेवी मूळ देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव 12 डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 6 वा. पर्यत डाळप फेरी, सायंकाळी 6 वा. पावणादेवी मंदिरात देवांचे आगमन, सायंकाळी 7.30 वा. पासून, स्वागत व देवीची ओटी भरणे, नवस फेडणे, 7.30 ते 10 वा. पर्यत महाप्रसाद, 10 वा. पंचारती, रात्री 12 वा. गणेश भवानी नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक, पहाटे 5 वाजता सुवर्णाचे ताट फिरवणे असा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव बांकिलिंग, पावनादेवी देवस्थान व हुबरट ग्रामविकास मंडळ मुंबई, देवस्थान मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी