सावंतवाडी मॅरेथॉन स्पर्धेतआचरेच्या प्रसन्न प्रभूचा विशेष गौरव

आचरा –अर्जुन बापर्डेकर सावंतवाडी येथे आंबोली सैनिक स्कूल आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत आचरा येथील अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रसन्न घनश्याम प्रभू या १२ वर्षीय धावपटूचा विशेष पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. प्रसन्न हा दिव्यांग असतानाही राज्यभरातून सुमारे ४०० स्पर्धक सहभागी झालेल्या स्पर्धेत सहभागी झाला. त्याबद्दल आयोजकांनी प्रसन्न याचे कौतुक करताना त्याला प्रेरणा देणाऱ्या आई – वडिलांना सलाम केला.

प्रसन्न हा आचरा पिरावाडी येथील शाळेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. त्याला खेळाविषयी आवड असल्याने त्याचे पालक घनश्याम प्रभू व आई आनंदित यांनी खेळामध्ये आणखीन रुची निर्माण व्हावी यासाठी आचरा येथील अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेवून दिला. अकॅडमी मध्ये संचालक सिद्धेश आचरेकर, प्रशिक्षक अनिकेत पाटील यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. प्रसन्न याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उतरवले जाते. यासाठी पालक नेहमीच सकारात्मक राहिले आहेत.

सावंतवाडी येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटातून त्याने आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्रसन्न हा एकमेव असा दिव्यांग धावपटू होता. प्रसन्न याच्या आईने आयोजकांना त्याच्याबद्दल माहिती दिली असता आयोजकांकडून त्याची दखल घेऊन विशेष रोख रकमेचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!