जिल्हा राष्ट्रवादीतर्फे आज वरिष्ठ अधिकार्‍यांचा सत्कार

शरद पवारांच्या वाढदिनानिमित्त उपक्रम

तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांची माहिती

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मंगळवारी होणार्‍या वाढदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्यावतीने जिल्ह्यातील व कणकवली तालुक्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर मुरकर व कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर तसेच पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांच्या कार्यालयात जात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जि. प. सीईओ प्रजित नायर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषीकेश रावले तसेच कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, डीवायएसपी घन:श्याम आढाव, पोलिस निरीक्षक अमित यादव, बीडीओ अरूण चव्हाण आदी अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषीसेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, विधानसभा कणकवली मतदारसंघ युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, कणकवली तालुका उपाध्यक्ष सागर वारंग, सुजल शेलार आदी उपस्थित राहणार आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!