कणकवली मतदारसंघातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समस्या संदर्भात आज नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

आमदार नितेश राणे यांच्याकडून बैठकी करिता पुढाकार
आरोग्यमंत्र्यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह होणार बैठक
कणकवली मतदार संघातील सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या समस्यांबाबत आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून, या समस्या सोडवण्यासंदर्भात आज 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे आरोग्यमंत्र्यांच्या दालनात दुपारी 3 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यासोबत आमदार नितेश राणे हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. जेणेकरून आरोग्य विभागातील समस्या सुटाव्यात व सार्वजनिक आरोग्यवस्थेचे बळकटीकरण व्हावे या दृष्टीने ही विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
दिगंबर वालावलकर /कणकवली