कर्मचारी सहकारी पतपेढीला जिल्हा बँक पाठबळ देणार

कुडाळ | ब्युरो न्यूज सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सहकारी बँक कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्ग या पतसंस्थेचे जिल्ह्यात काम चांगले आहे. आज ही पतसंस्था ग्राहक सेवा चांगल्या प्रकारे देत आहे. सभासद संख्या, भाग भांडवल वाढून पतसंस्थेची प्रगती झाली हे कौतुकास्पद आहे. येत्या काळात अधिकाधिक ग्राहक सेवा देण्यावर भर द्यावा. त्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, विविध भागात शाखा कार्यालये सुरू करावीत. ग्राहकांना चांगली सेवा देत असतानाच डिजिटलायझेशनवर भर द्यावा. ज्या ज्या वेळी सहकार्यासाठी ही पतसंस्था हाक देईल तेव्हा निश्चितच जिल्हा बँकेची पूर्ण ताकद पतसंस्थेला दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
जिल्हा शासकीय, निमशासकीय सहकारी बँक कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गचा दशकपूर्ती सोहळा रविवारी कुडाळ महालक्ष्मी हॉलच्या सभागृहात पार पडला. सोहळ्याचे उद्घाटन मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. पतपेढीचे अध्यक्ष शरद नारकर, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, पतपेढीचे उपाध्यक्ष प्रसाद कुंटे, जि.प.चे माजी वित्त व बांधकाम समिती सभापती जयेंद्र रावराणे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधिक्षक उर्मिला यादव, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ (पुणे) पतसंस्था निर्देशक एस.टी. जाधव, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार प्रकाश दळवी, प्राथमिक शिक्षक पतपेढी उपाध्यक्ष संतोष राणे, राज्य सहकारी बँक संचालक अमितगंगावणे, डॉ. पाटणकर, संचालक य नितीन जठार, शिक्षण विस्तार 3 अधिकारी सुनिता भाकरे, उदय शिरोडकर आदींसह संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
शरद नारकर म्हणाले, सर्व ज सभासद, संचालक यांच्या सहकायनि या पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरू स्तार आहे. सर्वाना सामावून घेणारी ही उदय जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे. लक, कोल्हापूरच्या धर्तीवर सिंधुदुर्गात या पतसंस्थेच्या माध्यमातून जास्तीत सर्व जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. सहकार वाढविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले.
प्रकाश दळवी, संतोष राणे यांनीही मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कासार्डे येथील शाखा कार्यालयाला जागा उपलब्धतेसाठी योगदान देणाऱ्या संजय पाताडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक व अन्य संघटना प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. पतसंस्था निर्देशक एस.टी. जाधव यांनी प्रशिक्षणपर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संचालक महेश गावडे, प्रास्ताविक संचालक उदय शिरोडकर व स्वागत श्री. नारकर यांनी केले, आभार नितीन जठार यांनी मानले..