धम्माल मौज मस्तीत साजरे झाले श्री बाळगोपाळ मंडळाचे वनभोजन

आचरा–अर्जुन बापर्डेकर धम्माल मौज मज्जा आणि गाण्यांच्या भेंड्या खेळत वनभोजनाचा आनंद लुटत आचरा वरचीवाडी येथील बालगोपाळ मंडळाचा वनभोजन स्नेहमेळावा देवगड मिठमुंबरी सुरुच्या बनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्री बाळगोपाळ मंडळ हे आचरा पंचक्रोशीत नावाजलेले मंडळ
अनेक सामाजिक सांस्कृतीक उपक्रमात ते अग्रेसर राहून आपली छाप उमटवीत असते.
आरती,भजन,दिंडी भजन,गरबा,गोमू नाच यासारख्या अनेक उपक्रम हे मंडळ उत्साहाने सहभागी होत असते.
हा स्नेह वृद्धिंगत व्हावा, मंडळामधील एकोपा वाढावा, या दृष्टीने मंडळाचे पदाधिकारी विलास आचरेकर, किशोर आचरेकर, महेश शेट्ये, पंकज आचरेकर आदींनी पुढाकार घेत देवगड मिठमुंबरी येथील सुरुच्या बनात निसर्ग रम्य ठिकाणी वनभोजनाचे आयोजन केले होते. लहान थोर मंडळीनी या वनभोजन कार्यक्रमात सहभागी होत मनोरंजनाचे कार्यक्रम , लंगडी लपाछपी खेळ खेळत,गप्पा मारत आपापल्या घडलेल्या फटफजेतीच्य गोष्टी सांगत
धम्माल मस्ती मजा करत वनभोजनाचा आनंद घेतला.वडीलधारी मंडळीही आपल वय विसरून यात सहभागी झाले होते.
अनेकांनी आपला फोटोग्राफीचा छंद जोपासत मोबाईल मध्ये फोटो शूटिंग करण्याचा आनंद घेत हे क्षण कॅमेराबद्ध केले.