वागदे मध्ये प्रवासी निवारा शेड चे काम सुरू

आमदार नितेश राणे यांनी दिल्या होत्या सूचना

सरपंच संदीप सावंत यांचा पाठपुरावा

वागदे डंगळवाडी हायवे वरील बस थाबा प्रवासी निवारा शेड च्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. वागदे ग्रामपंचायत मध्ये आमदार नितेश राणे यांनी दोन महिन्या पूर्वी भेट दिली असता ग्रामस्थ यांनी ही मागणी केली होती. आजूबाजूला 3 किलोमीटर पर्यंत बस थाबा साठी निवारा शेड नाही. त्यामुळे लोकांचे हाल होतात. शाळेतील मुलाना उन्हात उभे रहावे लागत होते. त्या साठी बस थाबा साठी निवारा शेड मिळावा या साठी मागणी केली होती.आमदार नितेश यांनी तात्काळ पत्र लिहून याची मागणी केली होती. दोन दिवसापूर्वी हे काम सुरुवात करण्यात आली. या साठी पाठपुरावा वागदे सरपंच संदीप सावंत यांनी केला. ग्रामस्थांनी या कामा बद्दल समाधान व्यक्त केले.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!