विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून देशपातळीवर नावलौकिक मिळवा!

कणकवलीतील प्रतिथयश दंतचिकित्सक डॉ. स्वप्नील राणे यांचे प्रतिपादन
साकेडी येथे झालेल्या केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा समारोप
केंद्रस्तरीय बालकला क्रीडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार या महोत्सवाच्या माध्यमातून प्रथमच होत असलेल्या साकेडी मधील कार्यक्रमामुळे सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आपल्या विद्यार्थ्यांना आपणच प्रोत्साहन दिले पाहिजे. असे कार्यक्रम वर्षाने घेण्यापेक्षा दर महिन्याला घेतलात तरी त्याकरता माझ्याकडून लागणारे सर्व सहकार्य मिळेल. असे प्रतिपादन कणकवलीतील प्रतिथयश यश दंतचिकित्सक डॉ. स्वप्नील राणे यांनी केले. सरस्वती विद्यामंदिर शाळा साकेडी या ठिकाणी केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार महोत्सव च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या समारोप प्रसंगी साकेडी सरपंच सुरेश साटम, जानवली सरपंच अजित पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद जाधव, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य महंमद जऊर शेख, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिगंबर वालावलकर, विशाखा राणे, प्रेरणा जाधव, समीक्षा परब, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अक्षता राणे, केंद्रप्रमुख काळु पवार, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन राणे, सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत बांबर्डेकर, मुख्याध्यापक समिधा वारंग, शिक्षक प्रभाकर पावसकर, उमेश मोरे, दीक्षा सावंत, तरदळे शाळा व्यवस्थापन समितीच्या घाडीगावकर, खरात, राणे यांच्यासह समूह गान व समूह नृत्य स्पर्धेला परीक्षक म्हणून उपस्थित असलेले परीक्षक कांबळे, राणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. राणी पुढे म्हणाले, तुमच्यातले टॅलेंट दाखवण्यासाठी ही संधी आहे. तुम्ही देशपातळीवर चमकण्यासाठी प्रयत्न करा. विराट कोहली सारखा क्रिकेटपटू सामान्य कुटुंबात जन्माला. मात्र त्याची आज मालमत्ता त्याला मिळालेला मान सन्मान पाहिल्यावर याची मेहनत यश हे अचंबित करणारे आहे. यशाची पहिली पायरी ही शाळेतून सुरू होते. यासाठी काहीही मदत लागली केव्हाही हाक मारा. मी तुमचा हक्काचा म्हणून नेहमीच धावत येईन अशी ग्वाही देखील डॉ. राणे यांनी दिली. या स्पर्धेसाठी तब्बल 75 हुन अधिक सन्मान चिन्ह डॉ. स्वप्नील राणे यांनी मोफत दिली. तर प्रमाणपत्र रमाकांत सापळे यांनी दिली. स्पर्धेच्या इतर नियोजनाकरिता येणाऱ्या खर्चा करिता ग्रामस्थांनी आर्थिक हातभार उचलला. स्पर्धेच्या दोन्ही दिवस सर्व विद्यार्थी, त्यांच्या सोबत असणारे पालक, शिक्षक या सर्वांसाठी शाळेच्या वतीने अल्पोपहार, जेवण ची सोय करण्यात आली होती. हे करण्याकरिता गावातील कृषी महिला बचत गटांनी पुढाकार घेतला होता. त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच गावातील भजन मंडळाकडून देखील या स्पर्धेच्या नियोजनाच्या तयारीसाठी पुढाकार घेतला गेला. सर्वांच्याच सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- लहान गट
50 मीटर धावणे मुलगे हितेश विशाल कदम प्रथम शाळा तरंदळे नंबर एक, वेदांत जगदीश सावंत द्वितीय,शाळा तरंदळे नंबर एक.
50 मीटर धावणे मुली आर्या राजेंद्र घाडीगावकर प्रथम शाळा तरंदळे देऊळवाडी
पूर्वा रविंद्र चव्हाण द्वितीय, शाळा तरंदळे नंबर एक, 100 मीटर धावणे मुलगे रुद्र राजेश पुजारे प्रथम शाळा तरंदळे नंबर एक,राजरत्न प्रसाद कदम द्वितीय शाळा तरंदळे नंबर एक,
100 मीटर धावणे मुली अक्षता निलेश पुजारे प्रथम शाळा जानवली मारुती मंदिर, संस्कृती सचिन माळी द्वितीय शाळा शाळा जानवली मारुती मंदिर. रिले 50 x 4 मुलगे तरंदळे नंबर एक प्रथम सकाळी नंबर एक द्वितीय
रिले 50 x 4 मुली जानवली मारुती मंदिर प्रथम साकेडी नंबर एक द्वितीय.
लांब उडी मुलगे राजरत्न प्रसाद कदम प्रथम शाळा तरंदळे नंबर एक, जैन तारीक शेख द्वितीय शाळा साकडी नंबर एक.
लांब उडी मुली आर्या राजेंद्र घाडीगावकर प्रथम शाळा तरंदळे देऊळवाडी.
अक्षता निलेश पुजारे द्वितीय शाळा जानवली मारुती मंदिर उंच उडी मुलगे
सुजल भरत कदम प्रथम शाळा तरंदळे नंबर एक रुद्र राजेश पुजारे द्वितीय शाळा तरंदळे नंबर एक. उंच उडी मुली नेहा उमेश सावंत प्रथम शाळा तरंदळे नंबर एक, शुभ्रा प्रकाश कदम द्वितीय शाळा तरंदळे नंबर एक ज्ञानी मी होणार तरंदळे देऊळवाडी प्रथम तरंदळे धनगरवाडी द्वितीय. कबड्डी मुलगे
साकेडी नंबर एक प्रथम जानवली मारुती मंदिर द्वितीय. कबड्डी मुली तरंदळे नंबर एक प्रथम साकेडी नंबर एक द्वितीय. खो खो मुलगे साकेडी नंबर एक प्रथम. खो खो मुली साकेडी नंबर एक प्रथम समूह गान जानवली मारुती मंदिर प्रथम. साकेडी नंबर एक द्वितीय समूह नृत्य जानवली मारुती मंदिर प्रथम साकेडी नंबर एक द्वितीय. मोठा गट 100 मीटर धावणे मुलगे आवेलीन दुमिंग म्हापसेकर प्रथम शाळा साकेडी नंबर एक. यश अरविंद घाडीगावकर द्वितीय शाळा तरंदळे नंबर एक 100 मीटर धावणे मुली स्नेहा गणेश मुंबरकर प्रथम शाळा तरंदळे नंबर एक श्रावणी बाळकृष्ण खरात द्वितीय शाळा तरंदळे नंबर एक. 200 मीटर धावणे मुलगे मनोज दिलीप होळकर प्रथम शाळा जानवली मारुती मंदिर. इब्राहिम हुसेन शेख द्वितीय शाळा साकेडी नंबर एक. 200 मीटर धावणे मुली रेणुका रमेश डोईफोडे प्रथम शाळा तरंदळे नंबर एक. सोनाली रामनाथ मोहरी द्वितीय शाळा जानवली मारुती मंदिर. रिले 100 x 4 मुलगे तरंदळे नंबर एक प्रथम. जानवली नंबर एक द्वितीय. रिले 100 x 4 मुली तरंदळे नंबर एक प्रथम.जानवली नंबर एक द्वितीय. लांब उडी मुलगे आवेलीन दूमिंग म्हापसेकर प्रथम शाळा साकेडी नंबर एक. सुरज शांताराम डोईफोडे द्वितीय शाळा तरंदळे नंबर एक लांब उडी मुली श्रावणी बाळकृष्ण खरात प्रथम शाळा तरंदळे नंबर एक सोनाली रामनाथ मोहरी द्वितीय शाळा जानवली मारुती मंदिर
उंच उडी मुलगे श्रेयस दत्ताराम मुणगेकर प्रथम शाळा तरंदळे नंबर एक. अभिजित अजित हरिजन द्वितीय शाळा जानवली नंबर 1
उंच उडी मुली ईशा संतोष मोडक प्रथम शाळा जानवली मारुती मंदिर.श्रावणी लक्ष्मीकांत सावंत द्वितीय शाळा जानवली मारुती मंदिर गोळा फेक मुलगे
मनोज दिलीप होळकर प्रथम शाळा जानवली मारुती मंदिर. आरुज अमर एरुडकर द्वितीय शाळा जानवली मारुती मंदिर. गोळा फेक मुली* ईशा संतोष मोडक प्रथम शाळा जानवली मारुती मंदिर. कृत्तिका हेमंत राणे द्वितीय शाळा जाणवली नंबर 1.कबड्डी मुलगे
तरंदळे नंबर 1प्रथम. जानवली मारुती मंदिर द्वितीय. *कबड्डी मुली तरंदळे नंबर 1प्रथम
साकेडी नंबर एक द्वितीय. खो खो मुलगे साकेडी नंबर एक प्रथम. खो खो मुली
साकेडी नंबर एक प्रथम. समूह गान
जानवली नंबर एक प्रथम.तरंदळे नंबर एक द्वितीय. समूह नृत्य जानवली मारुती मंदिर प्रथम. जानवली नंबर एक द्वितीय. ज्ञानी मी होणार साकेडी नंबर एक प्रथम.जानवली नंबर एक द्वितीय.
कणकवली/ प्रतिनिधी