अखेर ती तारीख ठरली

कणकवली – दि. ११ डिसेंबर रोजी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यापारी मित्रमंडळ सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये जमीन कुरेशी यांनी अशी माहिती दिली की, आमच्या नगरपंचायत जुने भाजी मार्केट आणि व्यापारी मित्रमंडळ कणकवली येथे सालाबाद प्रमाणे श्री. सत्यनारायणाची महापुजा २० जानेवारी २०२४ रोजी आयोजित केली आहे.
त्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष नेमला असुन, त्यांच्या नेत्रुवाखाली सर्व नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ सदस्यांची नेमणुक करत वेगवेगळी कामे नेमुन दिली आहेत.
ज्येष्ठ पत्रकार अशोक (काका) करंबळेकर, दादा कुडतरकर, संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या सल्ल्याप्रमाणे आणि माऊली मित्रमंडळ यांच्या सर्व सदस्यांच्या अनुमतीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.