वयाची 40 वर्षे होऊन देखील सुशांत नाईक अजूनही बालिश “बाबू”च्या भूमिकेत

माझी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा टोला

आमदार वैभव नाईक कधीही भरत गोगावले यांचा कोट घालण्याच्या तयारीत

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची कोपरखळी

माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी कणकवली शहरातील टिपि स्कीम व डीपी प्लान यामध्ये गल्लत करून शहरवासीयांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. 15 वर्षे नगरपंचायत मध्ये असलेल्या सुशात नाईक यांना टीपी स्कीम आणि डीपी प्लॅन यामधील फरक देखील समजला नाही. वयाची 40 वर्ष होऊन देखील सुशांत नाईक हे अजूनही बालिश बाबू असल्याचा टोला कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लगावला. कणकवलीचा शहर विकास आराखडा हा कोणत्याही परिस्थितीत शहर वासीयांना अंधारात ठेवून केला जाणार नाही. हा यापूर्वी आम्ही दिलेला शब्द आहे. व आम्ही दिलेल्या शब्दावर कणकवलीकरांना विश्वास आहे. या विश्वासाचा आम्ही आजपर्यंत केव्हा तडा जाऊ दिला नाही व याही पुढे तडा जाऊ देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपंचायत व मालवण नगरपरिषद ने टीपी योजनेत आम्ही समाविष्ट व्हायला तयार असल्याचा प्रस्ताव पाठवला होता. व त्याला मंजुरी मिळाली आहे. या योजनेची माहिती जनतेपर्यंत आपण समजावून सांगण्याची गरज आहे. त्याच विरोधी पक्षाची देखील भूमिका महत्त्वाची आहे. शहरातील ग्रीन झोन मधील 20 हेक्टर जमीन किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या एकत्रित रित्या जमीन असणाऱ्या जमीन मालकांनी याबाबत नगरपंचायत कडे प्रस्ताव करायचा आहे. त्यानंतर नगरपंचायत कडून या जमिनीचे रेखांकन करून त्याचा निवासी करिता यलो झोन करण्यात येणार आहे. व या विना वापर पडून राहिलेल्या जमिनी जनतेला जमीन मालकांना वापरता येणार आहेत. या योजनेचा शहरवासीयांना खरा फायदा आहे. शहरवासीयांना व जनतेला आमच्याकडून याबाबत जी काही मदत लागणार किंवा योग्य मार्गदर्शन लागेल ते आम्ही करणार आहोत. सुशांत नाईक यांनी देखील हे करण्याची गरज होती. मात्र हे न करता लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम नाईक करत आहेत. पंधरा वर्षे नगरसेवक राहिलेल्या सुशात नाईक यांचा नगरपंचायत मधला काडीमात्र अभ्यास नाही. मात्र ते मोठी स्वप्न पाहत आहेत. त्यांचे भाऊ आमदार वैभव नाईक यांनी तिकीट दिलं तर त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी. निदान शहरवासीयांना काय आश्वासने देतात ते देखील पाहता येईल असा टोला हर्णे यांनी लगावला. जर यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार वैभव नाईक यांना कोपरखळ्या लगावल्या, ते म्हणाले आता डीपी प्लॅन मंजूर झाला असे सांगणारे सुशात नाईक यांनी ज्यावेळी कणकवलीचा डीपी प्लान येईल व तो मंजूर होईल त्यावेळी मात्र त्याचे श्रेय घ्यायला जाऊ नये. नाईक हे ग्लोबेल्स नीती वापरतात यांच्या प्रत्येक बदलणाऱ्या भूमिका मी पाहिल्या असा टोला माजी नगराध्यक्ष नलावडे यांनी लगावला. कुडाळ मालवण चे आमदार वैभव नाईक यांनी देखील कुडाळमध्ये या ग्लोबल नितीचाच वापर केला व त्याचा फायदा मिळवला असा आरोप नलावडे यांनी केला.. सुशांत नाईक यांना आमदार वैभव नाईक हे बाबू म्हणतात व त्यामुळेच आपण सर्वजण त्यांना बाबू म्हणतो बाबू याचा अर्थ तो बाबुच असतो असा चिमटा देखील श्री नलावडे यांनी काढला. पत्रकार परिषद घेतली म्हणजे आपली अक्कल वाढली असं होत नाही. असा टोला देखील नलावडे यांनी लगावला. नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुशांत नाईक यांनी लढवावी आम्ही देखील वाट पाहत आहोत. पण आमदार वैभव नाईक यांनी त्यांना तिकीट दिलं पाहिजे असा टोला नलावडे यांनी लगावला. आमदार वैभव नाईक यांना आमदार भरत गोगावले यांनी कोट देण्याची सहमती दर्शवली अस आम्हि टीव्हीवर पाहिलं. पण मी तुम्हाला मनापासून सांगतो की आमदार वैभव नाईक हे कोट घालायला तयार आहेत. हा कोट कसा व कधी घालायचा याची वेळ आमदार वैभव नाईक शोधत असल्याचा टोला नलावडे यांनी लगावला. गोगावले यांचा कोट आमदार वैभव नाईक यांच्या खांद्यावर नक्कीच एक दिवस पडेल व सिंधुदुर्गातील जनता हे लवकरच बघेल असा दावा देखील नलावडे यांनी केला.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!