लाकूड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रीतम पोकळे

उपाध्यक्षपदी शिवाजी गवस; साटेली येथे शेतकरी, लाकूड व्यापाऱ्यांची बैठक
प्रतिनिधी l दोडामार्ग दोडामार्ग तालुका शेतकरी व लाकूड व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी कोनाळ येथिल प्रीतम प्रकाश पोकळे तर उपाध्यक्ष पदी शिवाजी गोविंद गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दोडामार्ग तालुका शेतकरी व लाकूड व्यापारी संघटनेची महत्वपूर्ण सभा रविवारी सार्वजनिक गणेशउत्सव सभामंडप साटेली येथे सायंकाळी 3.00 वा.संपन्न झाली.या बैठकीला तालुक्यातील शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. मागील कार्यकारणीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने बैठकीच्या सुरवातीलाच नवीन कार्यकारणी निवडी संदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी उपस्थित सभासदांनी अध्यक्ष पदासाठी प्रीतम पोकळे यांचे नाव सुचविले. व या नावास कुणाचाही विरोध नसल्याने त्यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी सन 2023 -24 या एक वर्षासाठी निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे:
अध्यक्ष-प्रीतम प्रकाश पोकळे, उपाध्यक्ष- शिवाजी गोविंद गवस,जानू नवलू झोरे,सचिव – ऋषिकेश सिताराम धर्णे, सहसचिव – बाबला उगाडेकर, खजिनदार- सचिन उगाडेकर,सह खजिनदार- फ्रान्सिस लोबो, गोपाळ अर्जुन परब, सदस्य – रुपेश डोईफोडे, समीर चिरमुरे, गंगाराम कोळेकर, मशुद करोल, चंद्रकांत देसाई, सुभाष गवस, शंकर हळदणकर, विठोबा पालयेकर, अभिजित देसाई, राधाकृष्ण देऊलकर, कृष्णा सावंत.