“राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२३” ने प्रकाश कानूरकर यांचा सन्मान

पोईप : पुणे येथे रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झालेल्या तृतीय राष्ट्रीय नवोपक्रम शैक्षणिक परिषद व पुरस्कार समारंभ २०२३ या कार्यक्रमात मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टा चे उपक्रमशील शिक्षक प्रकाश कानुरकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत
राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले
प्रेसिंडेट हाटेल, पुणे येथे संपन्न झालेल्या ग्लोबल मेडीया सेंटर, इंडिया यांनी आयोजित केलेल्या शैक्षणिक परिषदेमध्ये देश विदेशात कार्यरत असलेले 20 तज्ज्ञ मार्गदर्शक सहभागी झाले होते. यामध्ये युएसए आस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, इत्यादी परदेशात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांनी परदेशातील शिक्षण पद्धती व आपल्या देशातील शिक्षण पद्धती यावर चर्चा घडवून आणली. त्याचबरोबर आपल्या देशातील विविध राज्यांतील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी देशातील भविष्यात होणारा शैक्षणिक बदल स्विकारावा असे आवाहन केले. तसेच डॉ श्रीधर अय्यर यांनी मुलांनी कृतीशीलता व नवोपक्रमीय शिक्षण पद्धती आत्मसात केली पाहिजे. यासाठी पालकांनी व समाजाने आपल्यात बदल घडवून आणणे अपेक्षित आहे,असे रोखठोक मत मांडले.
या समारंभात आपल्या देशातील विविध राज्यांतील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्री प्रकाश कानूरकर यांना त्यांनी केलेल्या शिक्षणक्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक बदलांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल “राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार 2023” देऊन गौरव करण्यात आला.
या शैक्षणिक परिषदेमध्ये डॉ सत्यप्रकाश तिवारी, डॉ.अनंत भागवत, डॉ श्री एकनाथ खेडकर (व्हा.प्रेसिंडेट, अजिंक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी), श्रीमती पुजा शुक्ला (सिंगापूर), श्री नारायण कुमार फड, (जी.एम.सी.इंडिया.) डॉ.चैताली बिमल धरमशी( सिईओ, वर्ल्ड इंडिया एन आर आय फोरम) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या मिळालेल्या पुरस्काराबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा चे विश्वस्त सेवानिवृत्त कर्नल श्री शिवानंद वराडकर, ॲड. सोनू पवार, अध्यक्ष श्री अजयराज वराडकर, उपाध्यक्ष श्री शेखर पेणकर , उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर, सचिव श्री सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समिती चेअरमन श्री सुधीर वराडकर, सहसचिव श्री एस. डी. गावडे, व सर्व संचालक पदाधिकारी, तसेच वराडकर हायस्कूल कट्टा चे मुख्याध्यापक श्री संजय नाईक, व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

संतोष हिवाळेकर / कोकण नाऊ / पोईप

error: Content is protected !!