शेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

शासनाला दिले मागणीचे निवेदन
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील शेतकरी हवालदील झाला असुन त्यांच्या व्यथा ऐका. त्यांना पीक विमा मुदत वाढवून द्या अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसें सावंत यांनी शासनाकडे केली आहे. श्री. सावंत यांनी तहसीलदार कार्यालयात त्या आशयाचे निवेदन दिले.
शासनाने आता शेतक-यांचा अंत न पहाता जागे व्हावे असे सांगुन श्री सावंत म्हणाले, एकतर पिक विम्याची रक्कम मिळवताना आमदार वैभव नाईक यांना संघर्ष करावा लागला. म्हणुनच आज शेतकऱ्यांना उशिरा का होईना पण पिक विम्याची रक्कम मिळाली. असे असताना पुढील विमा उतरण्याचा कालावधी संपुन गेला असल्याने शेतकरी पिक विम्यापासुन वंचित राहणार आहे. त्यामुळे पिक विमा उतरवण्याचा कालावधी वाढवुन मिळावा अशी मागणी श्री सावंत यांनी केली.
यावेळी शिवसेना उबाठा गटाचे अतुल बंगे, तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, कुडाळ तालुका उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,वर्दे सरपंच पपु पालव, कुडाळ शहर उपशाखा प्रमुख गुरु गडकर व इतर उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





