स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रियांक खर्गे यांचा भाजपा युवा मोर्चा कडून निषेध

कणकवली छेडले जोडे मारो आंदोलन
कर्नाटक मधील काँग्रेसचे राज्यमंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने खर्गे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी खर्गे यांचा निषेध करत तीव्र भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी भाजपा अनुसूचित सेलचे नामदेव जाधव, समीर प्रभूगावकर, संतोष पुजारे, नितीन पाडावे, परेश कांबळी, लवू परब, शिवा गावकर, सदा चव्हाण, आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर,कणकवली





