नशाबंदी मंडळाच्या वतीने घटनेतील कलम 47. जागृती कार्यक्रमास प्रारंभ

२६नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने नशाबंदी मंडळाच्या वतीने घटनेतील कलम 47 च्या प्रचार मोहीमेला जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना कलमं ४७ची प्रत देऊन सुरूवात. करण्यात आली. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक तसेच कोकण विभागीय संघटक प्रमुख अर्पिता मुंबरकर यांनी अधिक्षकांना कलम ४७ला अनुसरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्तीच्या कार्याला न्याय द्यावा अशी विनंतीही केली. शिवाय पोलीस बांधव आणि पोलिस पाटील यांना आपण कायद्याचे रक्षक म्हणून ओळखत असतो म्हणूनच या प्रसार मोहिमेंतर्गत जिल्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या तसेच गावाच्या पोलिपाटलांच्या मदतीने या कलमांचा प्रसार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गावागावात व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. तरूण पिढी व्यसनं करून भरकटत आहे. ज्यांना आम्ही देशाचे आधारस्तंभ म्हणून युवकांकडे पाहतो. तोच आधारस्तंभ व्यसनात अडकतोय, विशेषतः अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत जाणारी पीढी पाहून लक्षात येते की आपण वेळीच सावध होऊन कलम 47 च्या आधारे पोलीस बांधव आणि पोलिस पाटील यांच्या मदतीने व्यसनांना अटकाव करता येवू शकतो. या प्रसार मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. समजून घ्यावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ओरोस प्रतिनिधी

error: Content is protected !!