संविधान बचाव यात्रा, मा. आनंदराज आंबेडकर यांचे कणकवली शहरात स्वागत.

कणकवली/मयुर ठाकूर.
राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळ आणि नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळ, कणकवली ( अप्पासाहेब पटवर्धन चौक ) चे सदस्य सुभाष उबाळे यांच्या नेतृत्वाखाली, मा. आनंदराज आंबेडकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु ( सरसेनानी रिपब्लिक सेना ), मा. काकासाहेब खांबाळकर ( प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना ), मा. विश्वनाथ कदम ( जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ) यांना पुष्पगुच्छ देत कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे स्वागत करण्यात आले.
संविधान बचाव ही यात्रा २४ ऑक्टोंबर २०२३ पासुन सुरु करण्यात आली आहे, हिच यात्रा ६ डिसेंबर २०२३ पर्यंत चालु राहणार आहे. या यात्रेची सुरुवात दिक्षाभुमी नागपुर पासुन झाली आहे; हिच पुढे जाऊन त्यांची चैत्यभुमी, दादर ( मुंबई ) पर्यंत जाणार आहे.
राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी फोनव्दारे संविधान यात्रेत उपस्थित असलेल्या, मा. आनंदराव आंबेडकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु ( सरसेनानी रिपब्लिक सेना ) संविधान बचाव, या महान कार्यास आमच्या सर्वच मंडळाचा संपुर्णपणे पाठिंबा आहे, असे म्हटले.
यावेळी अविनाश गावडे, भगवान कासले, प्रसाद घाडीगांवकर, प्रसाद पाताडे, प्रभाकर कदम, ज्ञानदेव मोडक, जनीकुमार कांबळे, सुभाष जाधव, प्रकाश कांबळे, संदीप कदम, बाळकृष्ण जाधव, दिलीप तरंदळेकर, दत्ता पवार, तानाजी कांबळे, अनिल तांबे, गोपीकृष्ण पवार आदी उपस्थित होते.