मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या डंपरला आग

मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे-तेरसे बांबर्डे सीमेवर आज सायंकाळी उशिरा चालत्या डंपरला आग लागली. डम्परचा जॉईंट तुटून डिझेल टाकीवर बसला आणि टाकी फुटली. चालत्या डम्परचा तो जॉईंट रस्त्यावर घासून ठिणगी उडाली आणि डंपरने पेट घेतला. चालकाने नियंत्रण मिळवून डंपर उभा केला. या अपघातात चालक सुखरूप असून हा डंपर मडूरे येथिल असल्याचे बोलले जात आहे.

डंपरला आग लागल्यामुळे मुबई मार्गिकेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून घटनास्थळी गर्दी झाली होती. कुडाळ पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे.

error: Content is protected !!