लोकसभा, जि. प., प. स. निवडणुकीच्या कामाला लागा!

जि. प. ला 50, पं. स. ला 100 उमेदवार मिळालेच पाहिजेत, कारणे नको

शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आदेश

दर महिन्याला श्री. फाटक घेणार पक्षवाढीचा आढावा

येत्या काळात होऊ घातलेल्या लोकसभा व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक साठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा. येत्या काळात शासकीय कमिट्यावरील प्रशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच केल्या जातील. पुढील महिन्यापासून मी स्वतः या ठिकाणी येऊन पक्षवाढि संदर्भात लक्ष देणार असून, 50 जिल्हा परिषद व 100 पंचायत समिती उमेदवार मिळालेच पाहिजेत. याबाबत काही खपवून घेतले जाणार नाही असे आदेश शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी आज कणकवली दिले. कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित बैठकी प्रसंगी श्री फाटक बोलत होते. यावेळी कणकवली, देवगड, कुडाळ, मालवण, वैभववाडी या पाच तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.सादर बैठकीत संघटना बांधणी, तसेच विकास कामाना निधी शासकीय कमिटीच्या नेमणुका व संघटना बांधणी बाबत येणाऱ्या अडचणी याविषयी चर्चा करण्यात आली. निधी आणि जिल्हा नियोजन सह शासकीय कमिटी बाबत मंत्री दिपक केसरकर,उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवतो. तसेच पुढील महिन्यापासून प्रत्येक तालुक्यात मी स्वतः येऊन बैठक घेणार,आणि तुम्हाला सर्व प्रकारची ताकद देणार. परंतु मला 50 जिल्हा परिषद व 100 पंचायत समिती मधे संघटना व उमेदवार मिळालेच पाहिजेत. यात कोणतीच हयगय सहन केली जाणार नाही. जिल्हा परिषद निहाय विकास कामांची यादी यावेळी घेण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या कामाना लवकरच मंजुरी घेतली जाईल. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,विधानसभा प्रमुख संदेश पटेल,बबन शिंदे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, योगेश तुळस्कर,राजा गावकर,अमोल लोके,भास्कर राणे,महेंद्र सावंत,शेखर राणे,हरेश पाटील,दिनेश गावकर,सिद्धी शिरसाट,शीतल सावंत, कणकवली महिला तालुकाप्रमुख ्प्रिया टेमकर,नगराध्यक्ष साक्षी प्रभू,पाचही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अनेक पक्षांमधून पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेमध्ये लवकरात प्रवेश करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!