राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता मुकेश साळुंखे यांनी केली राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर यांच्या घराकडील जागेची पाहणी.

कणकवली/मयुर ठाकूर.
राष्ट्रवादी जिल्ह्याचे प्रांतिक सदस्य विलास गावकर यांचं राहत घर हें हळवलं फाट्यानजिक आहॆ.अगदीच मुंबई-गोवा हायवेच्या बाजूला हें घर असल्याकारणामुळे हायवे चौपदरीकरणाच काम सुरु असताना आजूबाजूच्या परिसरात हायवे प्रशासनाकडून काही त्रुटी राहून गेल्या आणि त्याचा नाहक त्रास विलास गावकर यांना सहन करावा लागत आहॆ. हें घर जवळ जवळ 12/13 फूट हायवेवरून खाली गेले आहॆ. त्यामुळे याठिकाणी रिटेनिंग वॉल ची आवश्यकता असल्याचे राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता मुकेश साळुंखे यांच्या गावकर यांनी निदर्शनास आणून दिले. प्रसंगीं राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक,जिल्हा सचिव सतीश पाताडे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. उपअभियंता साळुंखे यांनी पाहणी केल्यानंतर गावकर यांना निवेदन देण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर आपण यावर योग्य ती उपाययोजना करू अशी ग्वाही दिली.