भाजपा वेंगुर्लेच्या वतीने कातकरी समाजा सोबत ” पालावरची दिवाळी ” साजरी

सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते कातकरी समाजाला फराळाचे वाटप

सावंतवाडी प्रतिनिधि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार समाजातील वंचितांना भारतीय हिंदू संस्कृती, सण, समारंभात सामील करून त्यांचे जीवन अधिकाधिक प्रकाशमय करण्यासाठी यावर्षी भाजपाच्या वतीने ‘ पालावरची दिवाळी ’ साजरी करण्यात आली.
भारतीय सण, समारंभ आणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सजग राजकीय पक्ष म्हणून भाजपा तर्फे कातकरी समाजा सोबत फराळ देऊन दिवाळी साजरी करण्यात आली .
यावेळी माजी आमदार मा.श्री. राजन तेली यांनी कॅम्प येथील कातकरी वस्तीत जाऊन पालावरची दिवाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळी चा फराळ वाटप केला . यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई व अँड. सुषमा खानोलकर , मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , जिल्हा का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , माजी सभापती सारिका कळसेकर ,महीला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले , राधा सावंत , वृंदा मोर्डेकर , महीला सरचिटणीस वृंदा गवंडळकर , नगरसेविका कृपा मोंडकर , बुथ प्रमुख सुधीर पालयेकर , बुथ प्रमुख शेखर काणेकर व रविंद्र शिरसाठ , अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख , नगरसेवक प्रशांत आपटे , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , असलम शेख , यश मोंडकर उपस्थित होते.

 
error: Content is protected !!