अन्यथा हायवेवर मातीचे डंपर ओतून आंदोलन करणार…!

हळवलं फाट्यावर होणाऱ्या वारंवार अपघातां विषयी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक आक्रमक.
कणकवली/मयूर ठाकूर
शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा जनतेला फायदाच होतो.किंबहुना नागरिकांचे जीवन सहज सुलभ होते.मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील वळण हे वाहनांचा व नागरिकांचा मृत्यू सापळा बनला आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये अर्ध्या डजनापेक्षा अधिक जीव घेणे अपघात झाले.सण 2021 च्या चतुर्थीच्या एक दिवस अगोदर सावंत नामक सर्वसामान्य घरातील वडापवाहतूक करणाऱ्या व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला आणि त्यामुळेच त्यांचे कुटुंब निराधार झाले. अशा प्रकारचे अनेक अपघात किमान आठवड्याला होत असतात. त्यामध्ये अनेक कंटेनर पलटी झाल्याचे वारंवार निदर्शनास येते.याचा स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे आणि या प्रश्नांप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक हे आज चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळाले.मुंबई-गोवा महामार्गावर हळवल फाट्यावर होणाऱ्या अपघातांच्या मालिकेबाबत त्यांनी आज कणकवली तहसीलदार यांना निवेदन दिले.तसेच येत्या पंधरा दिवसात येथे योग्य अशी उपाययोजना झाली नाही तर हायवेवर माती ओतून आंदोलन करण्याचा इशारा अबीद नाईक यांनी दिला आहे.यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता मुकेश साळुंखे उपस्थित होते.तात्काळ उपायोजना न केल्यास मी शांत बसणार नाही.स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अंगावर गुन्हे घेण्याची देखील तयारी माझी आहे.भलेही सत्ताधारी पक्षात मी असलो तरी देखील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात देखील आक्रमक पवित्रा घेत राहणार.फक्त आंदोलने करून शांत बसणारा अबीद नाईक नाही.तर आपण दिल्यानुसार पंधरा दिवसात जर योग्य ती उपाययोजना झाली नाही तर आपल्याला सुद्धा झोपू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता मुकेश साळुंखे यांना अबीद नाईक यांनी सुनावले.यावेळी येत्या दहा दिवसात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी केलेल्या मागणीप्रमाणे काम सुरू करू अशा प्रकारचे आश्वासन हायवे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले.या आंदोलनात प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, मालवण तालुका अध्यक्ष नाथ मालवणकर,प्रांतिक सदस्य श्री विलास गावकर, प्रांतिक सदस्य श्री दिलीप वर्णे,युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर,शहर अध्यक्ष अमित केतकर,सरचिटणीस गणेश चौगुले,किशोर घाडीगावकर,बापू परब, जिल्हा सचिव सतीश पाताडे, अशोक वायंगणकर,राजू पिसे, अंकुश मेस्त्री,बाळू मेस्त्री,सुरेश केनी,विकास म्हस्कर,राजू वर्दम, सतीश पार्सेकर,उदय सावंत,केदार खोत,इम्रान शेख,सुनील जंगले आदी उपस्थित होते.