‘दे आसरा फाऊंडेशन’चा जिल्ह्यातील नव उद्योजकांना मिळणार मोठा आधार

सिंधुदुर्ग दौऱ्यात अनेक चाकोरी बाहेरच्या प्रकल्पाना भेटी
‘माझा वेंगुर्ला’ आणि एमआयडीसी असोसिएशनचा पुढाकार
निलेश जोशी । कुडाळ : ‘माझा वेंगुर्ला’ या संस्थेच्या पुढाकाराने कुडाळ एम. आय. डी. सी. च्या सहयोगाने अलीकडेच दे आसरा फाउंडेशन पुणे या सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शक पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. या मधे त्यांनी चाकोरीबाहेर काम करणाऱ्या अनेक प्रकल्पांना भेटी दिल्या. तसेच स्वतःच्या उद्योगात धडपडणाऱ्या उद्योजक समूहांशी कुडाळ एम.आय.डी.सी. रेस्ट हाऊस येथे चर्चा केली.
‘दे आसरा फाऊंडेशन, पुणे’ ही संस्था देशभरातील सूक्ष्म, लघु उद्योजकांना व्यवसाय / उद्योग उभारणी ते उत्तरोत्तर वाढ यासाठी विविध टप्प्यावर मदत करीत असते. प्रसिध्द उद्योजक आनंद देशपांडे यांनी स्थापीत केलेल्या या संस्थेने आज पर्यंत लाखो उद्योजकांना आपल्या पायावर उभे करण्याचे व व्यवसायात धडपडणा यांना सावरण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
उद्यमशीलतेच्या तत्राना सर्वकष विकसीत करण्यासाठी आयोजित या प्राथमिक दौऱ्यात ‘दे आसरा’चे तज्ञ मार्गदर्शक श्रीमती वैशाली अपराजीत आनंद गोडसे, श्रीमती ऐश्वर्या कुलकर्णी यांचा सहभाग होता. कुडाळ एम.आय.डी.सी. अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी उद्योजकांना ही संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले. यावेळी असोसिएशन पदाधिकारी ऍड. नकूल पार्सेकर, व्यकटेश भंडारी उपस्थित होते. कॉयर क्लस्टरचे प्रर्वतक हर्षवर्धन बोरवडेकर, क्लॉलीटी उद्योगाचे अशोक मेस्त्री, बांबू पॅलेट उद्योग समुहाचे प्रर्वतक संतोष राणे, व्यापारी महासंघाचे सेक्रेटरी नितीन वाळके या चर्चेत सहभागी झाले होते. या संपूर्ण दौऱ्याचा समन्वय ‘माझा वेंगुर्ला’चे संचालक कपील पोकळे यांनी केले तर ‘माझा वेंगुर्ला’चे अध्यक्ष जनार्दन शटये यांनी या दौन्याच्या ओयाजनासाठी पुढाकार व प्रयोजकत्व सांभाळले.
हे फाऊंडेशन भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग उभारणी प्रकल्प अहवाल, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानातील मृदु कौशल्य, व्यावसायातील प्राथमिक कौशल्य, बाजारपेठ कौशल्य आदी विषयात ‘माझा वेंगुर्ला’ व एम.आय.डी.सी. असोसिएशन यांच्या सहकायनि आवश्यक मार्गदर्शक करणार आहेत.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.