भाई आता तरी थांबा, अजून किती संधी द्यायची तुम्हाला…

दोडामार्ग, भाई आपण १५ वर्षे आमदार, २ वेळा मंत्री आणि ४ वेळा ४ पक्ष बदलून देखील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देऊ शकत नाही अजून किती संधी द्यावी तुम्हाला? असा सवाल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विचारणारे बॅनर सद्यस्थितीत दोडामार्ग मध्ये झळकत आहेत. यात तुम्ही वरती चढत गेलात आणि प्रत्येक वेळा नवीन नवीन, काय- काय सांगलात ता आमका पटत गेला. हत्तीच्या वेळा तसा, पूर ईलो तेव्हा तसा, शेतीचा नुकसान झाला तेव्हाही तसा, असा कित्येकदा झाला भाई आता पुरे, आता थांबा असाही संदेश त्यावर लिहिण्यात आला आहे.

१५ वर्ष विकासापासून वंचित रखलेलो एक दोडामार्गवालो अशा नावाने हे बॅनर दोडामार्ग येथे झळकत आहेत. २ ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहे. यात भाई दोडामार्ग रुग्णालयातील आरोग्य सेवा रामभरोसे, कंत्राटी डॉक्टरांनी दिला राजी लामा, गेली दोन महिने महिला प्रसूची कक्ष बंद “बायकॉट दीपक भाई” अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी दीपक केसरकर यांनी आपण पुन्हा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. काही जण मी खासदारकी लढवणार असल्याचे सांगून आपली बदनामी करत आहेत. मात्र काही झाले तरी आपण पुन्हा एकदा ही निवडणूक लढणार, असा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर केसरकर विरोधकांकडून हे बॅनर लागल्याची चर्चा आहे.

error: Content is protected !!