कणकवलीत तब्बल 69 लाखाचे घबाड एलसीबीच्या हाती

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कणकवली मध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई
मुंबईच्या दिशेने होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूचा अख्खा टेम्पो भरून दारू जप्त
गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कणकवली तालुक्यात वारगाव येथे टेम्पो सहित 69 लाख 60 हजाराची दारू जप्त केली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या हाती ऐन दिवाळीच्या तोंडावर हे भले मोठे घबाड लागल्याने अवैध दारू वाहतूकदार यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरु कोयडे, हवालदार राजू जामसांडेकर, प्रकाश कदम, आशिष जामदार, बसत्याव डिसोझा, प्रमोद काळसेकर, यश आरमाकर, बाळू पालकर, श्री नार्वेकर यांच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध दारू वाहतुक दारांचे धाबे दणाणले असून, यापुढे देखील अशी धडक कारवाई सुरू ठेवणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून देण्यात आली. या प्रकरणी संबंधित दारू वाहतूक दरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली