वेदांत इमेजिग सेंटर, कणकवलीमध्ये अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनचे डॉ धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

08 November – आंतरराष्ट्रीय रेडियोलॉजी दिवस
कणकवली तेली आळी येथील डॉ सतीश पवार यांच्या वेदांत ईमेजिंग सेंटर मध्ये ट्रीवित्रोन व्ही टेन या अत्याधुनिक मशीनचे उद्घाटन कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ नागनाथ धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ धनंजय रासम, नैना मुसळे, शुभांगी पवार, नुपूर पवार, वेदांत पवार, मनाली राणे, शैलेश घाडी, ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.
नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग उत्तम निदानासाठी होईल असे उद्गार डॉ धर्माधिकारी यांनी काढले.
डॉ सतीश पवार यांनी आपले वैद्यकीय शिक्षण केइम हॉस्पिटल व लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल इथे पूर्ण केले. ते गेली बारा वर्षे कणकवली, तरेळे, देवगड, मालवण,राजापूर या भागात सोनोग्राफीची समर्पित सेवा देत आहेत.
कणकवली(प्रतिनिधी)