कुस्ती स्पर्धेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयास दोन सुवर्णपदके

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी पै. ऋषिकेश विश्वास जोशी याने ९२ किलो वजनी गटातून व द्वितीय वर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी पै.नितेश मारुती गायकवाड याने ९७ किलो वजनी गटातून मुंबई विद्यापीठ कोकण झोन कुस्ती स्पर्धेत या दोघांनी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धा मुंबई विद्यापीठ अंतर्गत जे. एस. एम. कॉलेज अलिबाग ,रायगड येथे सिंधुदुर्ग ,रत्नागिरी व रायगड या ग्रामीण विभागासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये इतर महाविद्यालयातील ४५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाकडून या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सुवर्णपदक प्राप्त केले व महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. त्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. एस .काकडे, उपप्राचार्य एम.आय. कुंभार, क्रीडा प्रशिक्षक अशोक पाटील, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. एस. बी. पाटील व सदस्य संजय रावराणे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थापदाधिकारी, प्राचार्य , प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्गाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.




