विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या हिंदी विषयाच्या अध्यापिका सौ प्राजक्ता कुबल यांच्या सेवानिवृती निमत्त शुभेच्छा व सत्कार समारंभ संपन्न

कणकवली/मयुर ठाकूर.
झाला . सौ कुबल मॅडम आपल्या नियत वयोमानानुसार ३३ वर्षचा प्रदीर्घ सेवेतून आज ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशालेतून निवृत्त झाल्या या कार्यक्रमाला विद्यामंदिर प्रशालेचे सर्व माजी शिक्षक तसेच आजी शिक्षक उपस्थित होते तसेच सौ कुबल मॅडम यांचे सर्व कुटुंब आणि पती कमलाकांत कुबल उपस्थित होते
सौ कुबल मॅडम यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण मुंबई महानगरात पूर्ण झाले वडिलांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे सर्व कुटुंब वेगुर्ला येथे स्थिर झाले आणि सातवी ते पदवी पर्यंतचे शिक्षण वेगुर्ला येथे झाले बीएड देवगड येथे झाल्यावर आडवली येथे शिक्षकी पेशाला सुरुवात झाली तेथून विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे सेवेत रुजू झाल्या गेली पंचविस वर्षे विद्या मंदिर प्रशालेत हिंदी विषयांचे अध्यापन करून हिंदी साहित्य ‘ ‘वाङ्मय ‘ व्याकरण या विषयांचे ज्ञान अथक प्रयत्न करून विद्यार्थ्यांना पोहचविले हिंदी राष्ट्रभाषा हिंदी प्रचार सभा ‘ हिंदी विशारद इ बाह्य परीक्षा प्रशालेत घेऊन हिंदी विषयांची अभिरुची विद्यार्थांत वाढवून ज्ञानाचा विकास केला .
हिंदी निबंध वक्तृत्व स्पर्धा प्रशालेत घेऊन विद्यार्थांना नेहमी प्रोत्साहित केले . सौ . कुबल मॅडम ह्या शांत ‘ स्वभावाच्या आहेत प्रामाणिक काम करणे हा महत्चाचा गुण त्यांच्या जवळ आहे विद्यार्थी प्रिय हिंदी शिक्षिका आहेत. विद्यार्थी व पालक यांचा स्नेह जपणे त्यांना आवडत असे .
हिंदी विषयाचे अनेक उपक्रम शाळेत सतत त्या राबवित असत सर्व सहकारी शिक्षकांशी प्रेमाने व आपुलकीने वागून आपल्या कार्याचा ठसा उमटविला . सौ . कुबल मॅडम यांना प्रेमळ स्वभावाने व विचारांने समृद्ध असे पती मिळाल्यामुळे त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही ठसा उमटविला . त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन व्यवसायात स्थिर झाली आहेत . श्रावण गावात नाव लौकिक मिळविलेले त्यांचे कुटुंब एकत्र पद्धतीने कार्य करत आहे. व्यापार व्यावसाय या माध्यमातून . कुबल कुटुंबाने राजकीय क्षेत्रात ही महत्चाचे कार्य करून सिंधुदुर्ग जिल्हात आदरणीय झाले आहे .
मा . कमलाकांत हे स्वतः उच्च शिक्षित आहेत. निष्णांत वकील आहेत कायद्याचा अभ्यास करून सर्व सामान्य माणसांना न्याय देणे हा त्यांचा महत्चाचा गुण आहे. त्याच्या वैचारिक पाठींब्याने सौ कुबल मॅडम यांची कारकीर्द बहरत गेली . आज विद्यामंदिर प्रशालेत त्यांच्या सेवानिवृती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी त्यांच्या महत्चाच्या गुणांचे पैलू उलगडून सौ कुबल मॅडम यांना शुभेच्छा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या . यावेळी सौ सावंत मॅडम श्री संदिप कदम . पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम श्री वणवे सर माजी शिक्षक श्री तानवडे सर ‘ सौ मानगावकर मॅडम माजी मुख्याध्यापक श्री सावंत सर श्री सरवदे सर श्री खांबल सर श्री नाडकर्णी सर उपस्थित होते . या शुभेच्छा सत्कार सोहळ्याचे निवेदन श्री सिंगनाथ सर यांनी केले . आभार सौ केळुसकर मॅडम यांनी मांडले यावेळी विद्या मंदिर प्रशालेचे सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित हाते तसेच इंग्लिश स्कूल व प्राथमिक विभागातील सर्व अध्यापक उपस्थित होते