सावडाव मधील “त्या” अपहरणाच्या घटनेत अनेक सवाल उपस्थित

लवकरच सत्य उजेडात येईल डीवायएसपी विनोद कांबळे यांची माहिती

पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव येथील सहा शाळकरी विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले असल्याचा दावा सावडाव येथील काही लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून करण्यात आला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.अपहरणाचा हा दावा करण्यात आला असला तरी याबाबत या सांगितल्या जात असलेल्या घटनेला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून त्यातील लवकरच सत्य उजेडात येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी दिली. दरम्यान याबाबत उपलब्ध माहितीनुसार सावडाव येथे एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे सहा विद्यार्थी शाळेच्या ड्रेस मध्ये धावत असताना तेथील एका शाळेतील शिक्षकांनी पाहिले व त्यांना संशय आल्याने त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागून जात त्यांना थांबवून विचारपूस केली. त्यावेळी त्या विद्यार्थ्यांकडून आपल्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान त्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिलेल्या माहितीनुसार त्या गावातील शाळेत शिक्षक असलेल्या श्री. काळे यांनी सावडाव ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काटे यांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर श्री. काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काटे यांनी त्या मुलांजवळ विचारपूस केली असता त्या मुलांनी अज्ञातांनी आम्हाला तेलीवाडी येथे त्या गाडीमध्ये जबरदस्तीने बसवलं तेथील साड्या दरम्यान आणून सोडल्याचे त्यांना सांगितले. दरम्यान त्या विद्यार्थ्यांची तर देखील तेथेच टाकण्यात आली होती. यावेळी च्या मुलांच्या चेहऱ्याला लाल रंगा सारखा काही तरी लावलेलं होतं अशी माहिती काटे यांनी दिली. यातील एका विद्यार्थिनीच्या डोक्याला देखील खरचटलेले होता असं या काटे यांनी सांगितलं. दरम्यान ही माहिती देत असताना सदरची मुले घाबरलेल्या स्थितीत होती अशी माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. मात्र एकूणच या संपूर्ण प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांचे अपहरण झाले तर ती आरडा ओरड करणार हे त्या अपहरण कर्त्यांना माहिती नव्हते का, मग विद्यार्थ्यांनी आरडा ओरड केली म्हणून अपहरण कर्ते यांनी त्यांना वाटेत का सोडले? जर अपहरण करायचेच असते तर अपहरण करते पूर्ण तयारीनिशी आले नसते का? या विद्यार्थ्यांचे अपहरण करून या अपहरण कर्त्यांना काही साध्य करायचे होते? किंवा त्यांच्या पालकाकडून काय मिळवायचे होते का? या विद्यार्थ्यांच्या दाव्या नुसार अपहरण करताना या अपहरणकर्त्यांनी सावडाव मधीलच विद्यार्थ्यांना का निवडले? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या संबंधित पोलीस तपासात लवकरच माहिती समोर येईल असे श्री. कांबळे यांनी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळतात डीवायएसपी विनोद कांबळे यांच्यासह कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक बंगडे व पोलिस पथक सावडाव मध्ये दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला. मात्र याबाबत कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोलीस पोचले नसून, सदर घटना घडली असल्याचे गृहीत धरून तपास सुरू असल्याचे डिवायएसपी श्री. कांबळे यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!