ज्येष्ठ नागरिकां करिता बँकांनी स्वतंत्र रांगांची कार्यवाही करा!

कणकवली पोलिसांच्या बँकांच्या प्रतिनिधींना सूचना

बँक एटीएम सुरक्षेबाबत काळजी घ्या

कणकवली : कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये स्वतंत्र रांगा कार्यरत ठेवण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचा बँकांनी गंभीर्याने विचार करा अशा सूचना कणकवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही एम चव्हाण यांनी दिल्या. कणकवली पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत बैठक घेत सूचना देण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांनी समस्या मांडल्या होत्या. या समस्यांबाबत पोलिसांकडून बँकांच्या प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलीस हवालदार किरण मेथे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. बँकांनी आपल्या एटीएम च्या सुरक्षेबाबतही काळजी घ्या. जेणेकरून एटीएमची सुरक्षा राखली जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना देखील रांगेकरता प्रत्येक बँकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी व त्यांच्या मागणीबाबत तातडीने कार्यवाही सुरू करा अशा सूचना श्री. चव्हाण यांनी दिल्या.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!