मा.नामदार दिपकभाई केसरकर मित्रमंडळ आदर्श शिक्षक पुरस्कार श्री.पी.जे कांबळे सर यांना प्रदान.

कणकवली/मयुर ठाकूर
शिक्षक हा ध्येयवेडा असतो . जीवनाच्या प्रत्येक वळणावर मांगल्याचा शोध घेऊन आदर्श जोपण्याचा प्रयत्न करणे हाच खरा जगण्याचा मार्ग आहे. हे तत्व मी आयुष्यभर जोपासत आलो . बालपण संस्कारी खेड्यात गेले आईवडील प्रचंड कष्ट सोसणारे मिळाले त्यांच्याच कष्टाला पाझर फुटले . त्या पाझरांचे अंकुरात रूपांतर करण्याची जिद्द मात्र उराशी बाळगून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील शिखर गाठण्याचा प्रयत्न केला . या सर्व प्रयत्नात गरीबी शिक्षणाच्या आड कधिच आली नाही . माझ्या जीवनाचे सर्वच सार मला मौनी विद्यापीठात गवसले तिथल्या वातावरणात ज्ञानाचा गंध होता . संस्कारांचा पिंड होता . आणि ध्येय निष्ठा जोपासून अध्यापन करणारे कर्तव्यदक्ष गुरु मिळाले त्यांचा श्वास निश्वास आमच्या सर्व विद्यार्थ्यात भिनत गेला. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आदर्श संस्कार करणारे शिक्षक दिले . मौनी विद्यापीठात बहुश्रृत करणारी व्याख्यान आयोजित केली जायची अनेक नामवंत पंडित आपल्या पांडित्याचे दर्शन घडवित असत त्यामधे प्राचार्य राम शेवाळकर ‘ प्राचार्य शिवाजीराव भोसले ‘ डॉ . लक्ष्मण देशपांडे ‘ उत्तम कांबळे , बाबा कदम ‘ शिवाजी सावंत ‘ आनंद यादव ‘ शंकर पाटील , छाया दातार ‘ विद्याबाळ सूर्यकांत मांडरे ‘ इ .वक्त्याच्या सहवासात मौनी विद्यापीठात जडणघडण होत होती . परुळेकर ग्रंथालय ‘ शाहू वाचलानाय यांनी ग्रंथांचे वेड लावले . डॉ. राजन गवस सर ‘ डॉ जयंत कळके सर ‘ प्रा . कुसूम कुलकर्णी मॅडम प्रा डी. ए पाटील सर डॉ. अच्यूत मानेसर डॉ. उपासे सर ‘ . डॉ. निरगुडकर मॅडम ‘ डॉ विनोद कुमरे सर या गुरुंच्या सहवासात वाङ्मयाची अभिरूची विकसित झाली . आयुष्यात तोल सावरत सावरत शिक्षकीपेशाला न्याय देत गेलो . समाज जीवनाचा तळ गाठत गेलो . समाज निकोप वृत्तीचा घडवा यासाठी सामाजिक वातावरणातील धुसरपणा जेवढा पुसता येईक तेवढा पुसत गेलो या सामाजिक कार्यात अनेक अडथळेही येत गेलो कधी ठेच लागली तरीही मागे हटलो नाही . विषयांचे अगाध ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करून विद्यार्थी घडवित गेलो . अनेकांगाने वाचन लेखन ‘ चिंतन करून विद्यार्थ्यांचे जीवन फुलवित गेलो . अनेक प्रकारचे लेखन करत राहिलो लेखनाच्या ज्ञानाला बळ मिळत गेले ग्रंथांची निर्मिती हातून होत राहिली. पर्यवरण शिक्षणाची गोडी लागली वृक्ष लागवड करत गेलो त्या छंदाला सामाजिक पाठिंबा मिळत गेला अंधश्रध्दा निर्मूलन कार्यात मनापासून काम करत राहिलो . स्पर्धा परीक्षांचा स्वतः अभ्यास करून उच्च परिक्षांर्थीनां ज्ञानदान करत आलो अनेकांनी यात उज्वल यश मिळविले तोच आनंद मनात साठवत गेलो . बालशिक्षण आणि उच्च शिक्षण यांचा सन्मवय सांधत गेलो . कणकवली शहरात कार्याचा ठसा उमटत गेला आणि आदर्श तत्चांचा कीर्ती मनात साठत गेली.
शिक्षकीपेशाला साजेल ‘ असे काम सतत माझ्या हातून घडत गेले . म्हणून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आदरणीय दिपकभाई केसरकर मित्र मंडळाच्या शिक्षण तज्ज्ञानी माझ्या सारख्या ध्येय वेड्या शिक्षकांची दखल घेऊन आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केले याचा मला खूप आनंद होत आहे . जीवन सुफल झाले असे वाटत आहे .
धन्यवाद
डॉ. पी जे कांबळे
कणकवली सिंधुदुर्ग .