राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधून ६ खेळाडू रवाना

संघटनेकडून शुभेच्छा

कणकवली : तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे आजपासून सुरू झाल्या असून १४ फेब्रुवारी पर्यंत असणार आहेत.

 या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६  खेळाडू रवाना झाले आहेत मुलांमध्ये-कु प्रणय कुडाळकर  कु. तन्वीर तांबे कु. गणराज शिरवळकर

मुलींमध्ये – कु. राजलक्ष्मी कांबळे कु. सोनिया चोडनेकर कु. प्रजोती जाधव यांचा समावेश आहे. खेळाडूंसोबत टीम कोच अविराज खांडेकर व टीम मॅनेजर मानसी मुरकर आहेत.
सहभागी खेळाडूंना जिल्हा संघटना अध्यक्ष संदेश पारकर, उपाध्यक्ष सौ. राजश्री धुमाळे,कोषाध्यक्ष सुधीर राणे,विनायक सापळे, अमित जोशी,एकनाथ धनवटे,जयश्री कसालकर,नितीन तावडे आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

       सहभागी खेळाडूंना जिल्हा संघटना अध्यक्ष संदेश पारकर, उपाध्यक्ष  सौ. राजश्री धुमाळे,कोषाध्यक्ष सुधीर राणे,विनायक सापळे, अमित जोशी,एकनाथ धनवटे,जयश्री कसालकर,नितीन तावडे आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!