कणकवलीत बैलगाडा दौड स्पर्धेत चंद्रकांत सावंत यांची बैलजोडी प्रथम

तुडूंब गर्दीत झाली लक्षवेधी स्पर्धा
विजेत्यांना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण
कणकवली : कणकवली विश्वकर्मा मित्र मंडळ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कणकवलीतील बैलगाडी दौड स्पर्धेत कणकवलीतील चंद्रकांत सावंत या बैलगाडी ने 48.19 सेकंदात निर्धारित अंतर पार करत प्रथम तर राजू बागवे कुंदे यांच्या बैलांनी 49.72 सेकंदात निर्धारित अंतर पार करून द्वितीय व चंद्रकांत वाटवे कुडाळ, पावशी यांच्या बैलांनी 50.91 सेकंदात हे अंतर पार केले. त्यांचा तृतीय क्रमांक आला. उत्कृष्ट बैलजोडी म्हणून वेंगुर्ले येथील प्रथमेश होडावडेकर यांच्या बैलजोडीला बहुमान मिळाला. तर उत्कृष्ट चालक म्हणून हळवल येथील संतोष ठाकूर यांना बहुमान मिळाला. विजेत्या स्पर्धकांना गटनेते युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तुडूंब गर्दीत ही स्पर्धा पार पडली.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली






