सत्कार सोहळा देवदूतांचा

श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ आणि आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने देवदूतांचा सत्कार करण्यात आला

आज दिनांक २३/१०/२० रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे रात्री अप रात्री मदत करण्यासाठी धाव घेणार्या तरुणांचा, जेष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर, बाळा शेट बाणे (व्यावसायिक) श्री सुरेश पाटकर जेष्ठ नागरिक सदस्य) यांच्या हस्ते जयगणेश कुवेसकर (अर्तिका मालक) यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला,
कुडाळ येथील व्हॅन मालक, कणकवली मधिल अर्तिका मालक, हिंदळे (देवगड) येथील रिक्षा मालक, सर्वात महत्त्वाचे हि सर्व तरुण मंडळी, आजच्या धकाधकीच्या काळात कुणाला एक दुसऱ्या ची चौकशी करण्यासाठी वेळ नाही,
असे असताना या तीन तरुणांनी काल स्वतः ची कामे बाजूला ठेवून, रात्री ची वेळ असुनही जी मदत केली , सगळीच तरुणाई भरकटत आहे, असे नाही, जयगणेश सारख्यासारख्या तरुणांमुळे समाज सुखाने जगु शकतो,
अशा या तरुणांचा सत्कार करताना मला शब्द हि कमी पडतील, आजच्या काळात या तरुणांचा आदर्श तरुण पिढी ने घ्यावा, असे मनोगत श्री अशोक करंबेळकर व्यक्त केले
आम्ही सहकुटुंब आई भगवती, कोटकामते येथे नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रम साठी गेलो असताना, चुक भुलीने वाहनाची लाईट चालू राहिल्याने, परत कणकवली कडे निघण्यास आलो, तेव्हा वाहन काही केल्या चालू होईना,
तेव्हा या तीन तरुणांनी एक ते दोन तास आपले खर्ची घालुन, यातील एका ने आपल्या वाहनाची बॅटरी काढून आमच्या वाहनाला बसवून वाहन सुस्थितीत करून दिले, आणि सर्वात महत्त्वाचे आज ज्याचा आम्ही सत्कार करतोय या तरुणांने कणकवली पर्यंत आम्हाला सोबत केली, असे मनोगत श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केले
यावेळी बाळा शेट बाणे यांनी मनोगत व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले
याप्रसंगी बाबुराव घाडीगावकर, प्रसाद पाताडे, पावसकर (फुलवाले) सईद नाईक, जमिल भाई, जयवंत जाधव, आणि पेडणेकर यांचे मित्र परिवार उपस्थित होता यावेळी उपस्थित सर्वांनी जयगणेश चे कौतुक केले, आणि शुभेच्छा दिल्या

error: Content is protected !!