त्रिंबक येथे दिवंगत लहू बाळाजी पवार स्मृती प्रीत्यर्थ शालेय गीतगायन स्पर्धा संपन्न

त्रिंबक, ता. मालवण (प्रतिनिधी) येथील जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहामध्ये पाचवी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा दोन गटांमध्ये दिवंगत लहू पवार गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लहू पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय गायकवाड सरांनी केले. त्यानंतर स्पर्धा संयोजिका कुटुंबीयांकडून सन्मा. मंगल पवार यांनी वडिलांच्या आठवणी आणि मार्गदर्शनपर विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक सन्मा. प्रवीण घाडीगावकर सर. , सन्मा. गायकवाड सर, सन्मा. मेस्त्री सर, सन्मा.गोसावी सर,सन्मा. घाडीगावकर मॅडम, सन्मा.धुरी मॅडम, आयोजिका- सन्माननीय सुरेखा लहू पवार , सन्माननीय रेखा पवार पोलीस हवालदार डि एस.पी.ऑ. रत्नागिरी,
सन्मा.मालती पवार, सन्मा.मंगल पवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गीतगायना नंतर धुरी सर यांनी आभार मानले. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आयोजकांमार्फंत लवकरच दिपावली सुट्टीनंतर आयोजित करण्यात येणार आहे

error: Content is protected !!