शाळा व्यवस्थापन समितीची अनोखी शक्कल

शाळा विकास निधी साठी काढली लकी ड्रा योजना
सध्या मराठी शाळांच्या समस्या उग्र बनत चालल्यात.अपूरी शिक्षक संख्या, इग्रजी मिडीयम शाळांच्या आक्रमणामुळे घटती पटसंख्या यामुळे मुलांचा ओढा आपल्या शाळेकडे वाढावा त्यांना योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक निधी उपलब्धतेसाठी
आचरा येथील केंद्र शाळा आचरा नंबर एक या शतकोत्तर शाळे च्या शाळा व्यवस्थापन व शाळा सुधार समिती तर्फे अनोखी शक्कल लढवली असून लकी ड्रा योजनेतून हा निधी उभारला जात आहे.
केंद्र शाळा आचरा नंबर एक या शतकोत्तर शाळेमधून अखंड ज्ञानदानाचे कार्य करत असताना सध्या कार्यरत आणि या अगोदरच्या शिक्षक वृंदांकडून मुलांना शिक्षणाबरोबरच इतरही कलागुणांना वाव देण्यासाठी महत्व पुर्ण योगदान दिले होते. याची परीणिती शाळेचे नाव जिल्हा स्तरावर अग्रक्रमाने घेतले जात असते. या शाळेच्या विकासासाठी शासनाकडूनही वेळोवेळी मदत दिली जात असते.पण नविन सुविधा मुलांना उपलब्धतेच्या दृष्टीने ती कमी पडत असते.यासाठी या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने कंबर कसली असून सर्व पालकांच्या सहकार्याने लकी ड्रॉ ऑफर सुरु केली आहे. यातून मिळणारया निधीतून मुलांना कॉम्प्युटर ज्ञानासाठी शिक्षक नेमणे,शाळेची डागडुजी,मैदानी खेळसाहित्य आदीसह अन्य बाबींच्या पुर्ततेसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती कडून सांगण्यात आले आहे. तरी या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसह शिक्षणप्रेमींनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आचरा–अर्जुन बापर्डेकर





