आयपीएस् सुभ्रमण्य केळकर यांना पितृशोक

श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालयाचे भालचंद्र केळकर यांचे निधन…..!

मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथील पुरोहित तसेच आचरा दशक्रोशी ब्राम्हण मंडळ, मालवण तालुका ब्राह्मण मंडळाचे माजी अध्यक्ष, इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान समिती सदस्य, श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष भालचंद्र दत्तात्रय केळकर यांचे रविवारी 22 आँक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाले ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ, बहिण, भावजया असा मोठा परिवार आहे. रविवारी रात्री चिंदर गावठणवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. आयपीएस् सुभ्रमण्य केळकर व सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यरत असलेले मकरंद केळकर यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!