वराडकर हायस्कूल कट्टाने साकारली चंद्रयान ३ ची प्रतिकृती….

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेत सरस्वती पूजनाचा मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व भारतीयांना अभिमान वाटावी अशी चांद्रयान ३ मोहीम भारताने यशस्वी करत थेट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लेंडर उतरवण्यात यश संपादन केले आणि संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला.
चंद्रयान तीन चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोठा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आलेही मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथन चांद्रयान तीन चे संचालक पी. व्ही. रामूथूवेल त्याचबरोबर कल्पना के. एम शंकरन, एस. मोहन कुमार,एस. उन्नीकृष्णन , ए. राजराजन यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती..
शालेय सरस्वती पूजन कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनात चांद्रयान ३ विषयी अधिक माहिती मिळावी या उद्देशाने चंद्रयान ३ बनवणारे शास्त्रज्ञ, प्रत्यक्ष चांद्रयान, विक्रम लँडर,प्रज्ञान रोव्हर यांची प्रतिकृती पर्यावरण पूरक साहित्यापासून बनवण्यात आली, यासाठी कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या प्रतिकृती बनवण्याचा आनंद घेतला.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर , उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर, श्री शेखर पेणकर, सचिव श्री सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई व सर्व संचालक मंडळ,शालेय समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक,शालेय संसद उपाधिपती श्री किसन हडलगेकर, शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!