खोटे बोलायचे आणि जनतेला खरे वाटावे म्हणून आंदोलने करायची!

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची ठाकरे गटावर जोरदार टीका
कंत्राटी भरती प्रक्रिया महायुती सरकारने केली रद्द
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच भ्रष्टाचार करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेसाठी शरद पवारांसारख्या नेत्यांचा आशीर्वाद घेतला.त्यांना त्यात भागीदार केले. काँग्रेसचे पाठबळ घेऊन राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आणि आज कंत्राटी भरती रद्द केल्याचा खोटा आव आणून स्वतःच केलेले पाप झाकण्याचा प्रयत्न उबाठा , शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष करत आहे. महाराष्ट्र राज्यातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे या पापाचे प्रायचित्त येत्या प्रत्येक निवडणुकीत देईल. अशी टीका भारतीय जनता पार्टीचे कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
खोटे बोलायचे आणि जनतेला ते खरे वाटावे म्हणून आंदोलने करायची ही ठाकरे,पवार,यांच्या पक्षाची कुणीच पद्धत आहे.महाराष्ट्र राज्यात सप्टेंबर 2021 पासून कंत्राटी भरतीचे आदेश उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शरद पवार यांच्या आदेशावरून अमलात आणले. त्यामुळे काँग्रेस,शरद पवार राष्ट्रवादी, आणि उबाठा हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र द्रोही आहेत. या तिन्ही पक्षांनी युवकांची फसवणूक केली आणि महाराष्ट्र राज्य आर्थिक संकटात सुद्धा आणले. त्यामुळेच या राजकीय नेत्यांचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या तिन्ही अभ्यासू नेत्यांचे सरकार आहे.यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र राज्याचे सरकार अधिक गतिमान झालेले आहे. हे तिन्ही नेते अभ्यासू असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्यात सत्ता केलेल्या चुका लक्षात घेवून मलई खाण्यासाठी केलेली कंत्राटी भरती या महायुती सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे भाजप,सेना,आणि अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी पक्ष यांचे अभिनंदन जनताच करत असल्याचे मिलिंद मेस्त्री यांनी निवेदनात म्हटले आहे.
कणकवली प्रतिनिधी





