राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा नंबर 5 मधील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट व खाऊ वाटप

विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी यावेळी कणकवलीतील शाळा नंबर 5 मध्ये विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट व खाऊ तसेच जेवण देण्यात आले. अबीद नाईक यांच्या या सामाजिक कार्याबद्दल शाळा व्यवस्थापनाने देखील समाधान व्यक्त केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष राजू पावसकर, अनिस नाईक, विलास गावकर,सुभाष उर्फ बाबू सावंत, इम्रान शेख, अमित केतकर, निशिकांत कडूलकर, सतीश पातडे आदी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी





