स्टंटबाजी कशाला म्हणतात त्याचे उत्तर उपसरपंच यांनी द्यावे

माजी सरपंच बापू फाटक यांचे आव्हान

कणकवली : कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित का ? अशी विचारणा महिलांनी केली . या अनुषंगाने उपसरपंच विलास हडकर यांनी वृत्तपत्राद्वारे ही विरोधकांची स्टंट बाजी असल्याचे म्हटले होते.
यावर माजी सरपंच बापू फाटक यांनी जोरदार आक्षेप घेत
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात असं नमूद केले आहे की,
22 जानेवारीपासून ते आजपर्यंत नळयोजनेला पाणी नाही हे नागरिकांनी ग्रामसभेत विचारले याला स्टंटबाजी कशी म्हणू शकता ? असा सवाल माजी सरपंच बापू फाटक यांनी करत स्टंटबाजी म्हणजे काय ? याचे सविस्तर स्पष्टीकरण उपसरपंच विलास हडकर यांनी द्यावे . अन्यथा येत्या पाच दिवसात पाणी आले नाही तर ग्रामपंचायत समोर हंडा कळशी घेऊन उपोषणास बसणार असल्याची माहिती बापू फाटक यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणतात की, 2017 मध्ये ज्यावेळी मी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी नळ योजनेचे थकीत बिल 3 लाख 42 हजार 520 रुपये थकीत होते. त्यामुळे विज वितरण कंपनीच्या वतीने कनेक्शन कापण्यात आले. त्यावेळी मी गावातील सर्वांना घेऊन आम.नितेश राणेंच्या समवेत चर्चा करून तात्पुरत्या स्वरूपात प्रश्न मिटविला होता. त्यानंतर मागील थकीत बिल आम्ही थोडं थोडं दर महिन्याला बिल भरणा करून कमी केले . तरीसुद्धा त्यावेळी मी ग्रामसभेमध्ये बिल थकीत आहे . पाणी पुरवठा कसं करु ? असं चुकुन सुध्दा बोललो नाही. तसेच नळ कामगार यांना 2007 पासून भविष्य निर्वाह निधी जीआर होता सरपंच झाल्यापासून पूर्ण फरक दिला व राहणीमान भत्ता सुध्दा दिलेला आहे.राहणीमान भत्ता आमच्या काळातील पूर्ण दिलेला आहे.व आता शिल्लक आहे तो मागील थकबाकी मधील आहे.
तसेच दोन पंप एकदम नादुरुस्त होते .सदर पंप मेकॅनिक बोलावून हे पंप दुरुस्त न होऊ शकत असल्याने या दोन्ही पंपांचा सर्वानुमते लिलाव करण्यात आला. तसेच आताच्या घडीला 3 पंप शिल्लक आहेत. विहिरीत पडलेला एक व एक बाहेर आहे. व एक नादुरुस्त झाला आहे. आता सुमारे 65 लाख रुपयांची जलजीवन मिशन अंतर्गत आमदार नितेश राणेंच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून नळ योजना मंजूर करून आणली असल्याचे शेवटी फाटक यांनी सांगत जर येत्या पाच दिवसात पाणी सुरळीत न केल्यास स्टंट बाजी आपण म्हणत असाल तर स्टंट बाजी करतच ग्रामपंचायत समोर हंडा कळशी घेऊन उपोषणास बसणार असल्याची माहिती बापू फाटक यांनी दिली आहे.

कणकवली / कोकण नाऊ / प्रतिनिधी

error: Content is protected !!