मालवण तालुका ऑलिंपिक स्पर्धेत हु .द . भा कोयंडे शाळा आचरा पिरावाडी चा द्वितीय क्रमांक

अध्ययन संस्था मुंबई आणि प्राथमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यात शालेय गणित सुधार उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत २०२३ या वर्षात प्रथम सत्रात मापन भाग -1 हा घटक घेतला होता. या घटकाची ऑलिंपिक स्पर्धा दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण या ठिकाणी पार पडली. या ऑलिंपिक साठी मालवण तालुक्यातील एकूण 12 शाळा सहभागी झाल्या होत्या. मापन भाग 1 या घटकाच्या ऑलिंपिक मध्ये वस्तूची लांबी मोजणे, मापनातील छोट्या राशी व मोठ्या राशी ओळखणे, वस्तू मोजण्यासाठी व्यावहारिक भाषेमध्ये कोणते एकक वापरतात यांच्या जोड्या जुळवणे, वेळेवर आधारित, तापमानावर आधारित शाब्दिक उदाहरणे तसेच प्रत्यक्ष प्रमाण काढणे, असे विविध प्रश्न होते. तसेच, चेंडूचा व्यास काढणे, शंकुची लंबउंची मोजणे, दिलेल्या पट्ट्यांची लांबी व रुंदी मोजणे, दिलेल्या वस्तूंचे वजन मोजणे, असे ऍक्टिव्हिटी राऊंड घेण्यात आले होते. या राऊंडमध्ये स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी दर्शवली. तसेच या स्पर्धेसाठी समीर चव्हाण यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले होते. या ऑलिंपियाड मध्ये मृणाल धुरी, मयूर कुबल, आयुष बाणे ,ताहिद मुजावर, दुर्गेश सारंग, श्रावणी पोटघन, गौरी उदगीरे, स्वरा तळवडकर, लक्ष वाडेकर, पलाश बिनसाळे या मुलांनी भाग घेवन द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!