खारेपाटणमध्ये ठाकरे गटाला धक्का

माजी सरपंच व माजी ग्रा. सदस्य यांचा भाजपात प्रवेश
कणकवली – खारेपाटण मध्ये देखील ठाकरे गटाला धक्का बसला असून ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले आहेत. उबाठा गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य उज्वला विरेंद्र चिके, व माजी सरपंच विरेंद्र बाळकृष्ण चिके यांनी उबाठा सेनेतून भाजपात प्रवेश केला.
यावेळी संतोष कानडे, वारगाव उपसरपंच नाना कोकाटे, इरफान मुल्ला, अशोक कोकाटे साळीस्ते उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी





