कुडाळ तालुक्यात उबाठा गटाला पुन्हा एकदा मोठा दणका

झाराप येथील आमदार वैभव नाईक यांचे शेकडो कार्यकर्ते भाजपा मध्ये दाखल
कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश
झाराप सरपंच, उपसरपंच ग्रा.प. सदस्य यांचा शेकडो कार्यकर्त्यांसहीत भाजप प्रवेश
निलेश जोशी । कुडाळ : तालुक्यात शिवसेना उबाठा पुन्हा एकदा मोठा दणका बसला आहे. आमदार वैभव नाईक यांचे झाराप येथीलशेकडो कार्यकर्ते कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये दाखल झाले आहेत. झाराप सरपंच, उपसरपंच ग्रा.प. सदस्य यांनी शेकडो कार्यकर्त्यांसहीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
तुम्ही ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी यावेळी आश्वासन दिले. .

झाराप ग्रामपंचायतीचे सरपंच सौ दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश परब, ग्रामपंचायत सदस्य अनंत मयेकर, अमोल तेली यांच्यासहित शेकडो ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतून भाजपमध्ये कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. या प्रवेशावेळी प्रदेश सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, चिटणीस विनायक राणे, माजी नगरसेवक पाटकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य स्वप्ना वारंग, पप्या तवटे, नगरसेवक अभी गावडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश कानडे यांनी केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





